रत्नागिरी- राजीवडा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या परिसरासह तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासून राजीवडा परिसरात आरोग्य यंत्रणेचा सर्व्हे सुरू होता. यादरम्यान आरोग्य सेविका, आशा सेविका घरोघरी माहिती घेण्याचे काम करत असतानाच एका माजी नगरसेवकाने या कामकाजात अडथळा आणत हा सर्व्हे रोखला.
रत्नागिरीत आशा वर्कर्सना आरोग्य संदर्भातील सर्व्हेपासून रोखले, माजी नगरसेवक ताब्यात
शनिवारी सकाळपासून राजीवडा परिसरात आरोग्य यंत्रणेचा सर्व्हे सुरू होता. यादरम्यान आरोग्य सेविका, आशा सेविका घरोघरी माहिती घेण्याचे काम करत असतानाच एका माजी नगरसेवकाने या कामकाजात अडथळा आणत हा सर्व्हे रोखला.
या परिसरात तुम्ही सर्व्हे करायचा नाही, असे सांगत आरोग्य यंत्रणेला पिटाळून लावले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे या प्रकाराची दखल घेतली. ते पोलिसांचा फौज फाटा घेत राजीवडा परिसरात दाखल झाले. आरोग्य यंत्रणेच्या कामात अडथळा आणणारा माजी नगरसेवक अब्दुल बिजली खान याला बोलावून घेत पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले. हा सर्व्हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही सरकारी कामात आडकाठी का आणताय, असा सवाल करत आशा वर्कर्सना रोखणाऱ्या अब्दुल बिजली खान याला ताब्यात घेतले. त्यानंतर या भागात पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी स्वतः दवंडी पिटत यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.