रत्नागिरी -राज्यातील गोरगरीब जनतेला एक रुपयाचं पॅकेजही देऊ न शकणारे ठाकरे सरकार लॉकडाऊनच्या धमक्या देत आहे. अशा वक्तव्यांमुळे सामान्य जनतेवर काय परिणाम होतो ते मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना कळणार नाही, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत, यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
निलेश राणे यांची सरकारवर टीका 'सरकारने फक्त पोकळ आश्वासने देऊ नयेत'
याबाबत बोलताना निलेश राणे म्हणतात की, लॉकडाऊनमुळे बेरोजगार होण्याची भीती जनतेला वाटत आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, ते लॉकडाऊनमुळे रस्त्यावर येतील. राज्यात कोरोना रुग्णांना बेड कमी पडत आहेत, याकडे आरोग्य मंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे. राज्य सरकारने फक्त पोकळ आश्वासने देऊ नयेत, तर गरिबाला मदत करण्याची मनसिक तयारी ठेवावी.
हेही वाचा -ड्रग्ज प्रकरण: अभिनेता अर्जुन रामपाल साऊथ आफ्रिकेला पळून जाण्याच्या तयारीत होता- एनसीबी