महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून निलेश राणेंनी अधिकाऱ्यांना झापलं, तर ठेकेदारांना धरलं धारेवर - ratnagiri mumbai goa haighway news

मुंबई-गोवा हा चौपदरी महामार्गावर अनेक ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र ठरत आहे. त्यामुळे इथल्या गावातील नागरिकांना घेऊन ठेकेदार आणि चौपदरीकरणाचे अधिकारी यांच्या समवेत थेट माजी खासदार निलेश राणेंनी संवाद साधला. अधिकारी आणि ठेकेदार यांना धारेवर धरत चौपदरीकरणात राहिलेल्या त्रृटी दूर करण्याच्या सूचना यावेळी राणेंनी दिल्या.

nilesh rane
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची निलेश राणेंकडून पाहणी.. अधिकारी, ठेकेदारांना धरलं धारेवर

By

Published : Jun 27, 2020, 7:51 AM IST

रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या संथ गतीने सुरू असलेल्या आणि नागरिकांचा विरोध डावलून ठेकेदारांकडून काम सुरू असलेल्या ठिकाणांची पाहणी माजी खासदार निलेश राणेंनी शुक्रवारी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर या दोन तालुक्यातील कामांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी कामातील त्रृटी लक्षात घेत त्यांनी ठेकेदारांची कानउघडणी केली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची निलेश राणेंकडून पाहणी.. अधिकारी, ठेकेदारांना धरलं धारेवर

मुंबई-गोवा हा चौपदरी महामार्गावर अनेक ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र ठरत आहे. त्यामुळे इथल्या गावातील नागरिकांना घेऊन ठेकेदार आणि चौपदरीकरणाचे अधिकारी यांच्या समवेत थेट माजी खासदार निलेश राणेंनी संवाद साधला. अधिकारी आणि ठेकेदार यांना धारेवर धरत चौपदरीकरणात राहिलेल्या त्रृटी दूर करण्याच्या सूचना यावेळी राणेंनी दिल्या. तसेच येत्या काही दिवसात चौपदरीकरणासंदर्भात योग्य कारवाई न केल्यास भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निलेश राणेंनी यावेळी दिला.

मुंबई गोवा महामार्ग-
मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास पुर्णपणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळून १२६९ किमी धावणारा हा महामार्ग मुंबईला केरळमधील कोची या शहराशी जोडतो. पनवेल, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, सावंतवाडी, पणजी, उडुपी, मंगलोर व कालिकत ही रा.म. १७ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. १७ हा कोकणातील तिन्ही जिल्हे जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details