रत्नागिरी -तेजस ठाकरे यांच्याकडे युवासेना प्रमुख पदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. यावरून भाजपा प्रदेश चिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना आणि तेजस ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक प्रहार केला आहे.
गरजेची पदं फक्त ठाकरे कुटुंब घेणार, बाकीच्यांनी चटया उचलायच्या - निलेश राणे - ratanagiri shiv sena news
तेजस ठाकरेकडे कुठलाही अनुभव नाही. कर्तृत्व काही नाही, आडनाव ठाकरे त्यामुळे हे होऊ शकतं. हा जंगलात फक्त पाल, सरडे शोधत होता, हे शोधता शोधता तो राजकारणात आला आहे. गरजेची पद फक्त ठाकरे कुटुंब घेणार, बाकीचे जे ठाकरेंबरोबर आहेत त्यांनी चटया उचलायच्या, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, तेजस ठाकरेकडे कुठलाही अनुभव नाही. कर्तृत्व काही नाही, आडनाव ठाकरे त्यामुळे हे होऊ शकतं. हा जंगलात फक्त पाल, सरडे शोधत होता, हे शोधता शोधता तो राजकारणात आला आहे. गरजेची पद फक्त ठाकरे कुटुंब घेणार, बाकीचे जे ठाकरेंबरोबर आहेत त्यांनी चटया उचलायच्या, खुर्च्या लावायच्या, घोषणा द्यायच्या, झेंडे फिरवायचे, त्यामुळे ठाकरेंची साथ किती द्यायची याचा विचार त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी करावा आशा शब्दांत निलेश राणे यांनी तेजस ठाकरे आणि शिवसेनेवर प्रहार केला आहे.