महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेसाठी मी सर्वात मोठा काटा झालोय - निलेश राणे - बाळासाहेब

शिवसेनेचा सर्वात मोठा काटा निलेश राणे झाला आहे. कारण त्यांना भीती आहे, निलेश राणे निवडून आला तर आपले सर्व धंदे बंद पडतील.

निलेश राणे

By

Published : Apr 12, 2019, 3:47 PM IST

रत्नागिरी - कुठेतरी निलेश राणे अडकला पाहिजे, कुठेतरी हा उमेदवार बाद झाला पाहिजे, यासाठी शिवसेनेचे सर्व प्रयत्न सुरू आहे. स्पर्धेमध्ये टिकू द्यायच नाही. त्यांचे सर्व सैन्य निलेश राणेला बाद करायला निघाले आहे, पण निलेश राणेला बाद करणे सोपे नाही. पण २०१९ मध्ये आमदार उदय सामंतला बाद करणार, असे जाकादेवी इथल्या सभेत बोलताना निलेश राणे म्हणाले.

निलेश राणे

शिवसेना एकट्या बाळासाहेब ठाकरेंमुळे वाढली नाही, नारायण राणेंसारख्या लोकांमुळे शिवसेना वाढली. शिवसेनेचा सर्वात मोठा काटा निलेश राणे झाला आहे. कारण त्यांना भीती आहे, निलेश राणे निवडून आला तर आपले सर्व धंदे बंद पडतील.

हे कार्यकर्त्याना मोठे होऊ देत नाहीत. आज यांचे कार्यकर्ते जेलमध्ये आहेत पण त्यांना बाहेर काढायला यांना वेळ नाही. तुमची ५ वर्ष खासदारकीची आणि माझी ५ वर्ष खासदारकीची एकाच व्यासपीठावर इंग्लिशमध्ये चर्चा करा, असे खुलं आव्हान देतो, असे राऊतांना उद्देशून निलेश राणे म्हणाले.

आम्ही आमच्या सभेला लोकांना खेचून आणत नाही, तुम्हाला लोकं खेचून का आणावी लागत आहेत. १५ वर्ष मतदारसंघात एक काम दाखविण्यासारख दाखवा. आज विनायक राऊत मातोश्रीला हप्ते देतो, म्हणून राऊत मातोश्रीच्या जवळ आहे. विनायक राऊत मातोश्रीच्या जवळ आहे म्हणून सामंतने राऊतला जवळ केले आहे, अशी टीका निलेश राणे यांनी यांनी खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत यांच्यावर केली.

ABOUT THE AUTHOR

...view details