रत्नागिरी - या ५ वर्षात महागाई कमी झाली का? अच्छे दिन आले का ?असे म्हणत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी सरकारसह उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांच्यावर चौफेर टीका केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी जाकादेवी येथे त्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
पाच वर्षात महागाई वाढली; करोडो तरुण बेकार झाले, कुठे आहेत अच्छे दिन?, नारायण राणेंचा मोदी सरकारवर घणाघात - नारायण राणे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी जाकादेवी येथे त्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नारायण राणे म्हणाले की, आमचा पक्ष कोकणासाठी जन्म घेतलेला पक्ष आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता आमचाच विजय होईल याची आम्हाला खात्री आहे. आम्ही जे काही बोलू ते सत्यच सांगू. ५ वर्ष तुम्ही खासदार आहात, सत्तेत आहात मग छातीठोकपणे सांगा तुम्ही किती प्रकल्प आणले, किती लोकांना बेरोजगार दिले, असा सवालही राणे यांनी यावेळी राऊत यांना केला.
या ५ वर्षात महागाई वाढली आहे. साडेतीन कोटी लोक बेकार झाले आहेत. सरकार १५ लाख खात्यावर देऊ शकले नाही. अच्छे दिन येणार असे सांगितले मग कुठे आहेत अच्छे दिन. या सरकारने लोकांना जगणे मुश्किल करून टाकले आहे. रत्नागिरीत आमदार, जिल्हापरिषद, पंचायत समित्या शिवसेनेकडे आहे, मग विकास झाला का? रत्नागिरीतले दारू मटका जुगार हे धंदे शिवसेनेचे असल्याची टीकाही राणेंनी यावेळी केली.