रत्नागिरी - शिवसेनेने सत्तेसाठी आणि पैशासाठी भाजपशी युती केल्याचा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला. स्वार्थासाठी शिवसेनेने भाजपसमोर शरणागती पत्करल्याचेही राणे म्हणाले. तसेच रिफायनरी प्रकल्प कोकणात कुठेही होऊ देणार नाही. जर हा प्रकल्प पुन्हा कोकणात आणण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही त्याला विरोधच करू असेही राणे म्हणाले.
'या' कारणासाठीच शिवसेनेने केली भाजपशी युती, नारायण राणेंचा आरोप - NANAR
शिवसेनेने सत्तेसाठी आणि पैशासाठी भाजपशी युती केल्याचा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला.
नारायण राणेंचा शिवसेनेवर आरोप
नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी शिवसेनेच्याच मंत्र्यांनी परवानग्या दिल्या. जमीन संपादनासाठी त्यांच्याच मंत्र्यांनी परवानगी दिली. हा प्रकल्प कोकणात यावा अशी मागणी शिवसेनेच्या अनंत गीते, विनायक राऊत यांनी केली होती. प्रकल्प आणलाही, मात्र, आम्ही सुरुवातीपासून आम्ही त्याला विरोध केला. जनता आमच्यासोबत होती. हे सर्व शिवसेनेने पाहिले आहे. कोकणात जर कुठेही हा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही त्याला विरोधच करू असा इशारा यावेळी राणेंनी दिला.