रत्नागिरी- सध्या नाणार प्रकल्पावरून स्थानिक जनता संभ्रमावस्थेत आहे. त्यातच शिवेसनेने नाणार प्रकल्प बाधितांच्या पाठिशी असतानाच शिवेसेनेचे आमदार प्रकाश साळवी यांच्या भूमिकेवरून संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर नाणार प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे; अशी ठोस प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिली आहे. खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'नाणार प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ' आमदार साळवी यांच्या भूमिकेशी शिवसेनेचा संबंध नाहीयावेळी चाळके म्हणाले की, राजापूर तालुक्यातील जैतापूर अणूउर्जा प्रकल्प तसेच नाणार ग्रीन रिफायनरी याबाबत शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी मांडलेली भूमिका त्यांची वैयक्तिक आहे. त्यांच्या भूमिकेशी शिवसेना संघटनेचा कोणताही संबंध नाही. नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. शिवसेनेनेच नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करून घेतली होती. त्यामुळे नाणार प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे स्पष्टीकरण शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिले आहे.
प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आजही कायम-नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीला स्थानिक जनतेचा विरोध होता. १४ गावातील बाधितांनी तीव्र आंदोलन उभे केले. याला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. शिवसेना कायमच स्थानिकांच्या सोबत राहिली आहेत. स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे शिवसेनेने ग्रीन रिफायनरीची अधिसूचना रद्द केली. या विनाशकारी प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध होता, तो आजही कायम आहे. त्यामुळे रिफायनरी बाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल हे आमदार राजन साळवी यांचे वक्तव्य वैयक्तिक आहे. याचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. आपण जिल्हाप्रमुख म्हणून जाहीर करत असलेली भूमिका शिवसेनेची भूमिका असल्याचेही चाळके यांनी सांगितले.