महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बाळ मानेंच्या नर्सिंग कॉलेजमुळे कोकणातील 2 हजार कुटुंबांना आर्थिक पाठबळ मिळाले' - nursing college in ratnagiri

नारायण राणे यांच्या हस्ते नर्सिंग कॉलेज मुलींच्या वसतीगृहाचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

mp narayan rane on bal mane
'बाळ मानेंच्या नर्सिंग कॉलेजमुळे कोकणातील 2 हजार कुटुंबांना आर्थिक पाठबळ मिळाले'

By

Published : Jan 11, 2021, 9:00 AM IST

रत्नागिरी -माजी आमदार, दी यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त बाळ माने यांनी सुरू केलेल्या नर्सिंग कॉलेजमुळे कोकणातील दोन हजार कुटुंबांना आर्थिक पाठबळ मिळाले. नर्सिंगसाठी मुलींच्या वसतीगृहाचे भूमीपूजन माझ्या हस्ते झाले. बाळ माने यांचे नर्सिंग कॉलेजचे काम उजवे असून त्यांना दीर्घायुष्य लाभो व अनेक उपक्रम त्यांच्याकडून होवोत, असे आशिर्वाद माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी दिले. दी यश फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन व व्यवस्थापकीय विश्‍वस्त बाळ माने यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

वसतीगृहाचे राणेंच्या हस्ते भूमीपूजन
यावेळी नारायण राणे यांच्या हस्ते मुलींच्या वसतीगृहाचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर दी यश फाउंडेशनचे सहव्यवस्थापकीय विश्‍वस्त माधवी माने, सहव्यवस्थापकीय विश्‍वस्त मिहिर माने, सहव्यवस्थापकीय विश्‍वस्त विराज माने, बाळ माने यांचे ज्येष्ठ बंधू हेमंतराव माने, भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, कुसुमताई पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. नाना शिंदे, माजी जि. प. उपाध्यक्ष सतीश शेवडे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, चंद्रकांत खानविलकर, कॉलेजच्या रजिस्ट्रार शलाका लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये रजिस्ट्रार शलाका लाड यांनी कॉलेजच्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन सौ. अनघा मगदूम-निकम यांनी केले.


रत्नागिरी जिल्हा पुढे जाण्यासाठी स्पर्धा केली पाहिजे
नारायण राणे म्हणाले की, 'नर्सिंग कॉलेजसाठी जागा मिळवून देण्यात मी प्रयत्न केले असले, तरीही स्थानिक मुलींना नर्सिगचे प्रशिक्षण दिले जावे ही संकल्पना बाळ मानेंची आहे. त्यामुळे कॉलेजचे श्रेय पूर्णतः माने यांनाच आहे. नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी चांगला आहार घेऊन सुदृढ व्हावे. सिंधुदुर्गमधील हॉस्पीटलमध्येही या विद्यार्थ्यांना नोकरी देऊ. कोकण आरोग्यात मागे नाही. येथे भरपूर स्वच्छता असल्याने भयावह रोगांचा प्रसार होत नाही. रत्नागिरी जिल्हा पुढे जाण्यासाठी स्पर्धा केली पाहिजे.'

मतमतांतरे झाली तरी सच्चे मित्र - अ‌ॅड पटवर्धन
या वेळी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष व भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन म्हणाले की, 'आज दुग्धशर्करा योग आहे. बाळ माने हे माझे कॉलेजजीवनातील मित्र असून आजपर्यंत त्यांच्यासोबतच भाजपामध्ये वाटचाल केली आहे. 34 व्या वर्षी जनमाणसाची नाडी त्यांनी ओळखून भाजपा तळागाळात पोचवली. आहे. राजकारण, क्रीडा, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम केले आहे. मतमतांतरे झाली तरी सच्चे मित्र म्हणून आम्ही कायम राहिलो.'

कोकणचे खरे नेते नारायण राणे - बाळ माने
व्यवस्थापकीय विश्‍वस्त बाळ माने म्हणाले, 'राणे कुटुंबियांशी आमचे अनेक वर्षे ऋणानुबंध आहेत. नर्सिंग कॉलेजसाठी भूखंड मिळणे ही प्रक्रिया फक्त राणेंच्या पत्रामुळे सहज शक्य झाली. जिल्हा मच्छीमार संघाची घोडदौड त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली. कोकणचे खरे नेते नारायण राणे आहेत. कोकणाला व नर्सिंग क्षेत्राला राणे यांच्या रूपाने राजाश्रय मिळावा.'


कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दी यश फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंगच्या सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी व्यवस्थित नियोजन केले. त्यांना रजिस्ट्रार सौ. शलाका लाड, प्राचार्य मीनाक्षी देवांगमठ यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात बाळ माने यांना शुभेच्छा देण्यासाठी नगरसेवक, विविध तालुक्यांचे भाजपचे अध्यक्ष, पदाधिकारी, शिक्षक, हितचिंतक उपस्थित होते.


कोरोनामुळे या कार्यक्रमाला मर्यादित लोकांना निमंत्रित केले होते. परंतु हजारो कार्यकर्त्यांना हा कार्यक्रम पाहता यावा याकरिता हा कार्यक्रम धनंजय पाथरे यांनी फेसबुक लाईव्ह केला होता. त्याला उदंड प्रतिसाद लाभला. ग्रंथपाल सौ. मानसी मुळ्ये यांनी आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details