रत्नागिरी :शिंदे गटाचे आमदार योगेश कदमयांनी पुन्हा एकदा माजी पालकमंत्री अनिल परब (former Guardian Minister Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला आहे. जिल्हा नियोजनमधील विकासकामांवरून योगेश कदम यांनी यापूर्वी माजी मंत्री, पालकमंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले (Yogesh Kadam criticizes former Guardian Minister) होते.
Yogesh Kadam criticize Anil Parab : अगोदरच्या पालकमंत्र्यांच्या पायंड्याला आज उत्तर मिळालं ; योगेश कदम यांची अनिल परब यांच्यावर टीका - अनिल परब यांच्यावर टीका
या अगोदरच्या पालकमंत्र्यांनी (former Guardian Minister Anil Parab) जो पायंडा पाडला होता, त्याला आज उत्तर मिळालं. असं म्हणत आमदार योगेश कदम यांनी साधला माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा (Yogesh Kadam criticizes former Guardian Minister) साधला.
नूतन पालकमंत्री उदय सामंत -स्थानिक आमदाराला निधी न देता राष्ट्रवादीच्या निवडणुकीत पडलेल्या माजी आमदाराला निधी दिला जात होता, असे आरोप आमदार कदम यांनी यापूर्वी केले होते. मात्र,काल जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यावर नूतन पालकमंत्री उदय सामंत यांचं अभिनंदन करतानाच माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यावर आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांनी निशाणा साधला आहे.
कदम म्हणाले -या अगोदरच्या पालकमंत्र्यांनी राजकियदृष्ट्या विकासकामं मंजूर करण्याचा पायंडा पाडला होता. त्याला आज चांगलं उत्तर कळत नकळत पालकमंत्री उदय सामंत यांनी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून दिलं आहे. असं म्हणत आमदार योगेश कदम यांनी माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला (Yogesh Kadam criticize Anil Parab) आहे.