महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्षांना मारहाण; मारहाणीच्या निषेधार्थ आ. संजय कदम यांचे धरणे आंदोलन

राष्ट्रवादीचे दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण यांना मारहाण करण्यात आली असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आमदार संजय कदम यांनी केला आहे. तसेच या मारहाणीच्या निषेधार्थ आमदार कदम यांनी मंडणगड तहसील कर्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले असून जोवर अटकेची कारवाई होत नाही तोवर जागेवरून हलणार नाही अशी ठाम भूमिका कदम यांनी घेतली आहे.

आंदोलन

By

Published : Aug 30, 2019, 4:36 AM IST

रत्नागिरी - राष्ट्रवादीचे दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण यांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी मंडणगड तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवरच धरणे आंदोलन केले. तर, प्रकाश शिगवण यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोपही संजय कदम यांनी केला आहे.

राष्ट्रवादीच्या दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्षांना मारहाण


दापोली-मंडणगड येथील विविध विकास कामाच्या भूमिपूजनाचा धडाका जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी लावला आहे. 28 ऑगस्टपासून त्यांच्या हस्ते भूमिपूजन सुरू आहेत. परंतु काही विकासकामांचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी पूर्वीच केले असून सध्याच्या विकासकामांचे राजकीय श्रेय शिवसेनेकडून घेतले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश शिगवण यांना मारहाण केल्याचा आ. संजय कदम यांचा आरोप


दरम्यान, रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम हे गुरुवारी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे भूमिपूजन करण्यासाठी मंडणगड येथे आले होते. पालवणी येथील भूमिपूजन करून मंत्र्यांचा ताफा चिंचघर येथे पोहोचला. यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, तालुका अध्यक्ष अनिल रटाटे, उपाध्यक्ष बशीर मसुरकर यांनी याठिकाणी निषेधाचे काळे निशाण दाखविले. यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत याचा विरोध केला. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. याचाच राग मनात धरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश शिगवण यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आमदार संजय कदम यांनी केला आहे.


यात प्रकाश शिगवण जखमी झाले तर, घटनेचा निषेध करण्यासाठी आमदार संजय कदम हे मंडणगड तहसील कर्यालयात पोहेचले. यानंतर मारहाण करणाऱयांना तातडीने अटक करा असे म्हणत जोवर अटक होत नाही तोवर जागेवरून हलणार नाही अशी ठाम भूमिका संजय कदम यांनी घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details