रत्नागिरी- कोरोनामुळे सध्या दहावीचा एक पेपर आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे, तर इतरही परीक्षा होणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याच पार्श्वभूमीवर एमपीएससी आणि युपीएससी परिक्षांवरही टांगती तलवार आहे. ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा यावर्षी संपणार आहे, त्यांना पुढील वर्षी परिक्षा देता यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
'MPSC परिक्षार्थ्यांची वयोमर्यादा एका वर्षांनी वाढवून देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार' - कोरोना न्यूज
ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा यावर्षी संपणार आहे, त्यांना पुढील वर्षी परिक्षा देता यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
युपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी एक वयोमर्यादा ठरलेली असते. यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षा यावर्षी कोरोनामुळे जर रद्द झाल्या, तर जे परीक्षार्थी यावर्षी परीक्षेसाठी बसले होते, पण ज्यांची यावर्षी परीक्षेसाठीची वयोमर्यादा संपणार आहे, अशांना पुढच्या वर्षी परीक्षा देता येणार नाही, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता यावी यासाठी त्यांच्या वयोमर्यादेचे एक वर्ष वाढवून द्यावे, यासाठी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर बोलून योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन यावेळी सामंत यांनी दिले.