महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 19, 2021, 3:21 PM IST

Updated : Jan 19, 2021, 7:28 PM IST

ETV Bharat / state

'रत्नागिरी जिल्ह्यातील ४७९ पैकी ३२४ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात'

कोरोना कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या समाधानकारक कामामुळे ग्रामीण भागातील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. हे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकातून स्पष्ट झाल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

Breaking News

रत्नागिरी - जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींपैकी ३२४ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्याचा दावा शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचाच सरपंच विराजमान होईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

'४७९ पैकी ३२४ जागी शिवसेना'

रत्नागिरी जिल्ह्यात मुदत संपलेल्या ४७९ ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. याविषयी उदय सामंत म्हणाले, की एकूण ४७९ पैकी ३२४ शिवसेना, ५२ राष्ट्रवादी, १४ भाजपा, ७५ गाव पॅनल, १ काँग्रेस, ३ मनसे, ६ महाविकास आघाडी, ३ ग्रामपंचायती इतर पक्षांना मिळाल्या आहेत.

'ग्रामीण जनतेचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास'

कोरोना कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या समाधानकारक कामामुळे ग्रामीण भागातील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. हे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकातून स्पष्ट झाल्याचे सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी तालुक्यात ५३ पैकी शिवसेना ४५

रत्नागिरी तालुक्यात ५३ पैकी शिवसेना ४५, भाजपा २, गाव पॅनेल ३, इतर पक्षाना ३ ग्रामपंचायती ताब्यात मिळाल्या आहेत. लांजा तालुक्यात २३ पैकी १२ शिवसेना, राष्ट्रवादी २, गाव पॅनेल ९, राजापूर तालुक्यात ५१ पैकी ३५ शिवसेना, राष्ट्रवादी १, भाजपा ४, गाव पॅनेल ९, मनसे २, संगमेश्वर तालुक्यात ८१ पैकी ५२ शिवसेना, राष्ट्रवादी ८, भाजपा २, गाव पॅनेल १८, काँग्रेस १, मंडणगड तालुक्यात १५ पैकी ११ शिवसेना, ३ राष्ट्रवादी, १गाव पॅनेल, दापोली तालुक्यात ५७ पैकी ४१ शिवसेना, १३ राष्ट्रवादी , १ भाजपा, दोन गाव पॅनेल, चिपळूण तालुक्यात ८३ पैकी ३४ शिवसेना, १३ राष्ट्रवादी, १ भाजपा, गाव पॅनेल ३०, महाविकास आघाडी ५, गुहागर तालुक्यात २९ पैकी २२ शिवसेना, ४ भाजपा, ३ गाव पॅनेल, खेड तालुक्यात ८७ पैकी ७२ शिवसेना, १२ राष्ट्रवादी, मनसे १, महाविकास आघाडी १असे यश प्राप्त झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Last Updated : Jan 19, 2021, 7:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details