महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पत्रकारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा मिळावा यासाठी वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांना भेटणार' - पत्रकारांना 'फ्रंट लाइन वर्करचा दर्जा

महाराष्ट्रातील पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून दर्जा द्यावा, अशी मागणी आपण स्वतः केली आहे. त्याचा पाठपुरावा देखील सुरू आहे. याबाबत मी डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रधान सचिवांशी स्वतः चर्चा करणार तसेच वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांशी बोलणार, असेही उदय सामंत यांनी सांगितले आहे.

मंत्री उदय सामंत
मंत्री उदय सामंत

By

Published : May 14, 2021, 4:13 PM IST

रत्नागिरी -इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही पत्रकारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देण्यात यावा, यासाठी विविध राजकीय पक्षाचे नेते मागणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा मिळावा यासाठी वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.

मंत्री उदय सामंत

'डिझास्टर मॅनेजमेंटच्या प्रधान सचिवांशीही बोलणार'

राज्य सरकारने पंधरा दिवसाचा लाॅकडाऊन वाढवला आहे. मुंबई लोकल आणि मेट्रोमधून सर्व सामान्यांना बंदी असणार आहे. मात्र पत्रकारांसाठी मंत्र्यांनी मागणी करूनही रेल्वे प्रवासाची सुट मिळालेली नाही. याबाबत बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, हा डिझास्टर मॅनेजमेंटने घेतलेला निर्णय आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला असेल, मात्र महाराष्ट्रातील पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून दर्जा द्यावा, अशी मागणी आपण स्वतः केली आहे. त्याचा पाठपुरावा देखील सुरू आहे. याबाबत मी डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रधान सचिवांशी स्वतः चर्चा करणार तसेच वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांशी बोलणार, असेही उदय सामंत यांनी सांगितले आहे.

'माहिती नसताना त्यावर बोलणे योग्य नाही'

महाविकास आघाडी सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी 6 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र टीका झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. या प्रकरणात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे. पैसे खर्च होणार नसतील तर चर्चा कशाला हवी, असे सांगत उदय सामंत यांनी पवारांची पाठराखण केली आहे. एखादी गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर जर चूक घडली, तर मुद्दाम केल्यासारखे होते. त्यामुळे कोणतीही माहिती नसतांना मी त्यावर बोलणं योग्य नाही, असेही यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा -सिंधुदुर्ग व गोव्यात हायअलर्ट; किनारी भागात वाहू लागले जोरदार वारे

ABOUT THE AUTHOR

...view details