रत्नागिरी - कोरोनाबाधित क्षेत्र असलेल्या पुणे-मुंबई महानगर क्षेत्रातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच याठिकाणावरुन येताना नागरिक कशेडी घाटासोबतच म्हाप्रळ व मौजे लाटवण येथील मार्गांचा वापर करतात. त्यामुळे, आता या मार्गांवरुन सर्वांच्या प्रवेशाला बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. आता केवळ कशेडी घाट मार्गानेच नागरिकांना येता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जारी केले.
कोरोनामुळे म्हाप्रळ, लाटवण मार्ग पूर्णपणे बंद, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
कोरोनाबाधित क्षेत्र असलेल्या पुणे-मुंबई महानगर क्षेत्रातून जिल्ह्यात येताना नागरिक कशेडी घाटासोबतच म्हाप्रळ व मौजे लाटवण येथील मार्गांचा वापर करतात. त्यामुळे, आता या मार्गांवरुन सर्वांच्या प्रवेशाला बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
कोरोनामुळे म्हाप्रळ, लाटवण मार्ग पूर्णपणे बंद
मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 115 नुसार हा आदेश कोरोना प्रसार रोखण्यासाठी जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हे मार्ग बंद होत असल्याने मंडणगड तालुक्यातून अत्यावश्यक सेवा वाहने व मालवाहू वाहने यांच्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तहसीलदार मंडणगड व पोलीस निरीक्षक मंडणगड यांच्या समन्वयाने हा पर्यायी मार्ग निश्चित करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Last Updated : May 7, 2020, 10:52 AM IST