महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माझ्यावर झालेली कारवाई अयोग्य, राजीनामा देणार नाही - मंदा शिवलकर - मंदा शिवलकर

नाणार रिफायनरीला समर्थन करणाऱ्या काही शिवसैनिकांनी आपल्यावर कारवाई झाली तरीही उद्याच्या समर्थनाच्या सभेला जाणार, अशी भूमिका घेतली आहे. उद्या होणाऱ्या रिफायनरी समर्थनाला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी प्रकल्पाला समर्थन करणाऱ्या कोकण जनकल्याण प्रतिष्ठाणच्या सदस्यांनी व्यक्त केली.

नाणार समर्थक
नाणार समर्थक

By

Published : Mar 2, 2020, 8:20 AM IST

Updated : Mar 2, 2020, 8:58 AM IST

रत्नागिरी- नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा रान पेटले आहे. रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांची शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने हकालपट्टी करत असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी नाणार विरोधाच्या मेळाव्यात जाहीर केले. दरम्यान, याबाबत मंदा शिवलकर याना विचारले असता आपल्यावर झालेली करवाई अयोग्य आहे, आपण बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहोत, त्यामुळे पक्षातून हकालपट्टी झाली तरी जिल्हा परिषद सदस्याचा राजीनामा देणार नाही अशी भूमिका मंदा शिवलकर यांनी स्पष्ट केली आहे.

माझ्यावर झालेली कारवाई अयोग्य, राजीनामा देणार नाही - मंदा शिवलकर

नाणार रिफायनरीला समर्थन करणाऱ्या काही शिवसैनिकांनी आपल्यावर कारवाई झाली तरीही उद्याच्या समर्थनाच्या सभेला जाणार, अशी भूमिका घेतली आहे. उद्या होणाऱ्या रिफायनरी समर्थनाला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी प्रकल्पाला समर्थन करणाऱ्या कोकण जनकल्याण प्रतिष्ठाणच्या सदस्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -...तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी 'त्यांची' थोबडं रंगवावीत; नाणारवरून राऊत आक्रमक

Last Updated : Mar 2, 2020, 8:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details