रत्नागिरी - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून शासन, प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस रात्रंदिवस काम करत आहेत. कोरोनाच्या लढ्यात अनेक नागरिकही आपापल्यापरीने सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. रत्नागिरीच्या शांतीनगर येथील व्यापारी सुधीर पटवर्धन यांनी पत्नी आणि मुलीच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. त्यांनी 50 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
पत्नी अन् मुलीच्या वाढदिवसानिमित्त केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - Social commitment
कोरोनाच्या लढ्यात अनेक नागरिकही आपापल्यापरीने सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. रत्नागिरीच्या शांतीनगर येथील व्यापारी सुधीर पटवर्धन यांनी पत्नी आणि मुलीच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. त्यांनी 50 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. सुधीर पटवर्धन यांनीही पत्नी सीमा पटवर्धन आणि मुलगी सिद्धी पटवर्धन यांच्या वाढदिवसानिमित्त गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्याला काजरघाटी येथील पटवर्धन बंधूंनी मान्यता देत सहकार्याचे आश्वासन दिले.
त्यानुसार काजरघाटी येथील वॉर्ड क्रमांक दोनमधील सर्व 50 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यात त्यांना गिरीधर पटवर्धन, गजानन पटवर्धन, उल्हास पटवर्धन, दिलीप पटवर्धन, भावना पटवर्धन, ग्रामपंचायत सदस्य प्राची कांबळे, मानसी पटवर्धन यांच्यासह वॉर्ड क्रमांक दोनमधील तरुणांनीही उत्तम सहकार्य केले.