रत्नागिरी: नाशिकच्या बस दुर्घटनेवर (Nashik Bus Accident) देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत ही बस दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. तसेच भविष्यातील अपघात टाळण्यासाठी महामार्गांवरील सगळे ब्लॅक स्पॉट शोधून काढा असे आदेश त्यांनी दिले आहेत.
Nashik Bus Accident: भविष्यातील अपघात टाळण्यासाठी महामार्गांवरील सगळे ब्लॅक स्पॉट शोधून काढा - रवींद्र चव्हाण - नाशिक बस दुर्घटना
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (minister Ravindra Chavan) यांनी नाशिक बस दुर्घटनेवर (Nashik Bus Accident) शोक व्यक्त करत ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. तसेच भविष्यातील अपघात टाळण्यासाठी महामार्गांवरील सगळे ब्लॅक स्पॉट शोधून काढा असे आदेश त्यांनी दिले आहेत.
काय म्हणाले रवींद्र चव्हाण: रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, "नाशिकमध्ये बसला झालेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे. या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्यात याचा तपास येणाऱ्या काळात केला जाईल. या अपघातात ज्यांचा मृत्यू झालाय त्यांना मुख्यमंत्र्यांनी 5 लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. (CM help to Nashik Bus Accident). तसेच अपघात टाळण्यासाठी महामार्गांवरील सगळे ब्लॅक स्पॉट शोधून काढण्यास सांगितलेले आहेत. हा रिपोर्ट आल्यानंतर ज्या उपाययोजना करायला हव्यात त्या केल्या जातील तसेच अपघाताचं प्रमाण कमी व्हायला हवं यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू, असंही मंत्री चव्हाण यांनी म्हटलं आहे.