रत्नागिरी - गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत, मात्र चाकरमान्यांचा या गाड्यांना थंड प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. या गाड्यांच्या जवळपास 182 फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
शनिवारी रात्री लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरीसाठी सुटलेली पहिली 'गणपती स्पेशल ट्रेन' आज (रविवार) पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली, वेळेआधीच जवळपास अर्धा ते पाऊण तास अगोदर ही गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली. मात्र, अवघे 11 चाकरमानी या गाडीतून रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरले. त्यामुळे अतिशय अल्प प्रतिसाद या गाडीला मिळाल्याचे पहायला मिळाले.
'गणपती स्पेशल ट्रेन'ला थंड प्रतिसाद, पहिल्या गाडीने अवघे 11 चाकरमानी रत्नागिरीत दाखल गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली. 10 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी करण्यात आला. मात्र 12 ऑगस्टपर्यंत आल्यास 10 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी गणेश चतुर्थीपर्यंत पूर्ण होणार होता. मात्र 12 तारखेनंतर येणाऱ्यांना वैद्यकीय चाचणी तसेच कोरोना चाचणी करूनच येता येणार आहे. त्यामुळे विशेष ट्रेन सोडण्याची मागणी करण्यात येत होती. पण गाडी सोडण्याचा निर्णय 12 ऑगस्टपर्यंत काही झाला नाही आणि कदाचित त्यामुळेच अनेक चाकरमानी एसटी बस तसेच खासगी वाहनांनी 12 ऑगस्टपूर्वी गावी दाखल झाले.
'गणपती स्पेशल ट्रेन'ला थंड प्रतिसाद 'गणपती स्पेशल ट्रेन'ला थंड प्रतिसाद पण 2 दिवसांपूर्वी गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा झाली आणि कालपासून (शनिवार) या गाड्या मुंबईतून सुटण्यास सुरुवात झाली आहे. मात्र दरवर्षी ट्रेनने हजारोंच्या संख्येने येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या यावर्षी मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकी होती. रत्नागिरीत दाखल झालेल्या या पहिल्या गाडीने अवघे 11 चाकरमानी रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाले. त्यामुळे एकूणच गणपती स्पेशल ट्रेनला थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..