रत्नागिरी -तालुक्यातील मावळंगे येथे दोन भावांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. सुदैवाने दोघेही भाऊ या हल्यातून बचावले आहेत. या भागात बिबट्याने हल्ला केल्याची ही पाचवी घटना आहे.
रत्नागिरात 'जिम'ला जाणाऱ्या भावांवर बिबट्याचा हल्ला, परिसरातील पाचवी घटना
सोमवारी (८ जून) सकाळी पावणे सातच्या सुमारास मावळंगे गावातील विक्रांत जाधव (१७) आणि योगेश जाधव (३०) हे जीमसाठी निघाले होते. दुचाकीवरुन जात असताना दबा धरलेल्या या बिबट्याने दोघांवर हल्ला केला.
सोमवारी (८ जून) सकाळी पावणे सातच्या सुमारास मावळंगे गावातील विक्रांत जाधव (१७) आणि योगेश जाधव (३०) हे जीमसाठी निघाले होते. दुचाकीवरुन जात असताना दबा धरलेल्या या बिबट्याने दोघांवर हल्ला केला. त्यामुळे दोघेही गाडीवरून खाली पडले. बिबट्याने पहिल्यांदा योगेशच्या पायावर झडप टाकली. त्यानंतर विक्रांतवरही झडप घातली. योगेशने दुचाकी कशीबशी सुरू करुन बिबट्याला बिथरवण्यासाठी त्याच्या अंगावर घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर विक्रांत बिबट्याच्या तावडीतून सुटल्यानंतर दुचाकीवरुन या दोघांनी पळ काढला.
बिबट्याच्या हल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.