महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी शहरानजीक शिरगावात बिबट्या दिसल्याने नागरिक भयभीत - Leopard was seen in Ratnagiri

रत्नागिरी शहरानजीक शिरगावात बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे

leopard-was-seen-in-shirgaon-village-near-ratnagiri-town
रत्नागिरी शहरानजीक शिरगावात बिबट्या दर्शन

By

Published : Dec 13, 2019, 7:11 PM IST

रत्नागिरी -शहरानजीक शिरगाव शिवरेवाडीच्या आदिष्ठी मंदिराजवळ बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडले. आपल्या दोन पिल्लांसोबत बिबट्या मादी दिसून आल्याने ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले आहेत.

हेही वाचा -रत्नागिरीत अजगराला पकडण्यात सर्पमित्राला यश

शिवरेवाडी परिसरात असलेल्या मंदिराकडे ग्रामस्थांची नेहमी ये-जा असते. गुरुवारी मध्यरात्री वाहनातून जाणाऱ्या नागरिकांना कातळावर मादी बिबट्या आपल्या दोन पिल्लांसमवेत दिसून आली. बॅटरीच्या प्रकाशझोतात बिबट्या मादी व तिची पिल्ले दिसताच काहीवेळ साऱ्यांचीच भीतीने गाळण उडाली. त्या बिबट्या मादी व पिल्लांचे मोबाईलद्वारे चित्रिकरणही करण्यात आले. ही बातमी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याने परिसरात ग्रामस्थ पुरते भयभीत झाले आहेत. बिबट्याचा नागरी वस्तीजवळ मुक्त संचार पाहुन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा - शिकारीला गेलेला युवक बंदुकीची गोळी लागून जागीच ठार

ABOUT THE AUTHOR

...view details