रत्नागिरी - तिसऱ्या टप्प्यातील लाॅकडाऊनमध्ये मजुरांना आपल्या घरी जाण्याची परवनागी देण्यात आली आहे. मात्र, त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. या प्रमाणपत्रासाठी रुग्णालयांमध्ये सध्या मजुरांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातही यासाठी अनेक मजुरांनी सकाळपासून गर्दी केली होती. मात्र, काही जण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याचे दिसून आले.
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात आरोग्य प्रमाणपत्रासाठी मजुरांची गर्दी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, हाताला काम नाही, जवळ पैसा नाही. त्यामुळे अनेक परप्रांतीय मजुरांनी पायी चालत आपल्या गावची वाट धरली होती. आता लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात या मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ठिकठिकाणच्या रुग्णालयांमध्ये गर्दी होताना पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, हाताला काम नाही, जवळ पैसा नाही. त्यामुळे अनेक परप्रांतीय मजुरांनी पायी चालत आपल्या गावची वाट धरली होती. आता लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात या मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ठिकठिकाणच्या रुग्णालयांमध्ये गर्दी होताना पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातही मजुरांसह, जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काही नागरिकांनी या प्रमाणपत्रासाठी गर्दी केली होती. त्यामुळे रुग्णालयाबाहेर मजुरांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत होते. मात्र, तरीही काहीजण या नियमांचे पालन करताना दिसत नव्हते.