महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी चाकरमान्यांपुढे विघ्न; कोकण रेल्वेचे आरक्षण हाऊस फुल्ल - railway

मुंबईतून तसेच कोकणातून कोकण रेल्वेच्या आरक्षण केंद्रावर आरक्षण मिळेल या हेतून सकाळपासून अनेक जण आरक्षणाच्या प्रतिक्षेत होते. तासंतास लांब रांगेत उभे राहून सुद्दा कोकण रेल्वेचे आरक्षण अवघ्या काही तासात हाऊस फुल्ल होत आहे. रांगेत पहिल्या पाच मध्ये सुद्धा उभे राहून हातात वेटिंगची तिकिटे पडत असल्याचे चाकरमानी सांगत आहेत.

कोकण रेल्वे

By

Published : May 5, 2019, 10:43 AM IST

Updated : May 5, 2019, 11:44 PM IST

रत्नागिरी- कोकणातला गणेशोत्सव आणि मुंबईतला चाकरमानी यांचे एक वेगळेच नाते आहे. कितीही अडचणी आल्या तरी हा चाकरमानी गणपती उत्सवासाठी आपल्या गावी जातोच. पण, विघ्नहर्त्याच्या दर्शनाला जाण्यासाठी त्याच्या मार्गात विघ्न येत आहेत. कारण गणेशोत्सवासाठी चार महिने आधीच कोकण रेल्वेच्या आरक्षित सीट फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे या गणेशोत्सवाला कसे जायचे हा प्रश्न चाकरमान्यांसमोर उभा राहिला आहे.

गणरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी चाकरमान्यांपुढे विघ्न; कोकण रेल्वेचे आरक्षण हाऊस फुल्ल

२ सप्टेंबरला येतायेत गणराय

चाकरमान्यांची कोकणात येण्यासाठी आणि जाण्यासाठीची भिस्त कोकण रेल्वेवर असते. गणेशोत्सवासाठी कोकणात येण्यासाठी १२० दिवस आगोदर कोकण रेल्वेचे आरक्षण करता येवू शकते. त्यासाठी आरक्षणाची संधी शनिवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे २ सष्टेंबरच्या गणरायाला आदल्या दिवशी निघण्याचे प्लॅनिग करत असाल तर थांबा. कारण आज सलग दुसऱ्या दिवशी कोकण रेल्वेच्या नियमित धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण हाऊस फुल्ल झाले आहे. पण कोकण रेल्वेच्या अकाऊंटवरून जवळपास सर्वच गाड्यांचे आरक्षण रिग्रेट दाखवले जात आहे.

मुंबईतून तसेच कोकणातून कोकण रेल्वेच्या आरक्षण केंद्रावर आरक्षण मिळेल या हेतून सकाळपासून अनेक जण आरक्षणाच्या प्रतिक्षेत होते. तासंतास लांब रांगेत उभे राहून सुद्दा कोकण रेल्वेचे आरक्षण अवघ्या काही तासात हाऊस फुल्ल होत आहे. रांगेत पहिल्या पाच मध्ये सुद्धा उभे राहून हातात वेटिंगची तिकिटे पडत असल्याचे चाकरमानी सांगत आहेत.

सिटिंग किंवा स्लिपर रेल्वे गाड्यांमध्ये वेटिंगशिवाय तिकिट नाही. तर अनेक गाड्यांचे तिकिट सध्या रिग्रेट म्हणुन दाखवत आहे. ऑनलाईन आरक्षणाची सुद्धा हिच परिस्थिती आहे. कोकण रेल्वेच्या नियमित धावणाऱ्या गाड्यांचे वेटिंगचे आरक्षण ५०० च्या वर पोहचले आहे. त्यामुळे या गाड्यांचे तिकिट रिग्रेट दाखवत आहे. २९ ऑगस्टपासूनच्या तिकिटांसाठीच्या आरक्षणाला सुरवात झाली. मात्र प्रवाशांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गाड्या सोडाव्यात अशी मागणी होत आहे.

रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाची काय स्थिती आहे ते पाहूया...

  • कोकणकन्या एकस्प्रेस - १ सप्टेंबरचे आरक्षण ३ एसी - १३५ वेटिंग
  • स्लिपर क्लास - ४११ वेटिंग, २ एसी ३९ वेटिंग
  • तुतारी एक्स्प्रेस - आरक्षण रिग्रेट ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर
  • मांडवी एक्सप्रेस- आरक्षण रिग्रेट ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर
  • जनशताब्दी एक्सप्रेस - आरक्षण रिग्रेट ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर
  • मत्स्यगंधा एक्सप्रेस - आरक्षण रिग्रेट ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर
  • तेजस एक्सप्रेस - १ सष्टेंबर १ एसी १५ आणि २ एसी- ८४
Last Updated : May 5, 2019, 11:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details