रत्नागिरी - छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आणि जतन केलेल्या राज्यातील गडकोटांचे वैभव असेच अबाधित रहावे यासाठी रत्नागिरीत दाखल झालेल्या राजा शिवछत्रपती परिवाराकडून किल्ले जयगडची साफसफाई करण्यात आली. परिवारातील एकूण सहाशे सदस्यांमध्ये रत्नागिरीच्या सदस्यांचाही समावेश होता.
राजा शिवछत्रपती परिवाराकडून किल्ले जयगडाची स्वच्छता
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना स्वराज्याच्या रक्षणासाठी उभारलेल्या गडकोटांची अवस्था बिकट झाली आहे. हे गडकोट जपण्यासाठी राजा शिवछत्रपती परिवाराकडून प्रयत्न सुरू आहेत.
राजा शिवछत्रपती परिवाराकडून किल्ले जयगडाची स्वच्छता
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना स्वराज्याच्या रक्षणासाठी उभारलेल्या गडकोटांची अवस्था बिकट झाली आहे. हे गडकोट जपण्यासाठी राजा शिवछत्रपती परिवाराकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ६०० शिवभक्त गडकोटांच्या संवर्धनासाठी दाखल झाले होते. राजा शिवछत्रपती परिवाराकडून किल्ले जयगड येथील संपूर्ण परिसर बालेकिल्ला, खंदकाची सफाई, तटबंदिवरची झुडपे, परकोटाची सफाई, बुरूज सफाई व इतर परिसर स्वच्छ करण्यात आला.