रत्नागिरी- नियम सर्वांना सारखेच असतात मग तो सामान्य माणूस असो अथवा सरकारी कर्मचारी हे दाखवून दिले आहे, याची प्रचिती एका सरकारी कर्मचाऱ्याला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पोलिसांमुळे आली. पोलिसांनी रस्त्यावरून जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याने गुटखा खाऊन थुकल्याने त्यालाच ते साफ करायला लावले आहे.
गुटखा खाऊन रस्त्यावर थुकंला सरकारी कर्मचारी... खेड पोलिसांनी शिकवला धडा - police teach lesson to government employee
शासकीय भरारी पथकातील कर्मचारी मास्क न लावता गुटखा खात असल्याचे पोलिसांच्या निदर्शना आले होते. तसेच ते कर्मचारी रस्त्यावरच थुंकले. यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी त्यालाच ते स्वच्छ करायला सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. त्याचवेळी कोरोना भरारी पथकाच्या शासकीय वाहनातून जाणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्याला मास्क न लावता गुटखा खाताना डीवायएसपी प्रवीण पाटील यांनी पाहिले. त्यानंतर पोलिसांना ती गाडी थांबवायला सांगितली. हे दोघेही शासकीय कर्मचारी गाडीतून उतरले आणि रस्त्यावर थुंकले, हे पाहून डीवायएसपी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की संतापले.
सर्वांसमोर घडलेल्या या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्याच रुमालाने ते साफ करायला लावले. जिल्ह्यात थुंकण्यास देखील बंदी असल्याचे तसेच तोंडाला मास्क लावणे अनिवार्य असल्याचे त्या कर्मचाऱ्याला सांगत एकदा समज देऊन सोडण्यात आले.