महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आत्मशक्ती ओळखण्याचे साधन म्हणजे योग साधना - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

जागतिक योग दिनानिमीत्त रत्नागिरीत ही योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात रत्नागिरीवासीयांनी उत्स्फूर्ततेने प्रतिसाद नोंदविला.

जागतिक योग दिन रत्नागिरीत उत्साहात साजरा

By

Published : Jun 21, 2019, 4:55 PM IST

रत्नागिरी - आपली आत्मशक्ती ओळखण्याचे साधन म्हणजे योग आहे. योग साधनेतून आपण स्वत:च्या क्षमता ओळखून त्याचा विकास करु या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज जागतिक योग दिनानिमित्त शहरात झालेल्या कार्यक्रमात केले. रत्नागिरी येथील माळ नाका भागात असणाऱ्या भागीरथी हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पतंजली योग पीठ यांच्या संयुक्तविद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात रत्नागिरीवासीयांनी चांगला सहभाग नोंदविला.

जागतिक योग दिनानिमीत्त बोलताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एक संकल्पना दिली आहे. सन २०१४ मध्ये योगासाठी संयुक्त राष्ट्र संघामध्ये त्यांनी भाषण केले. जून २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू करण्यात आला. आपण धकाधकीच्या जीवनामध्ये काम करीत असताना वेगवेगळ्या जीवनशैलीत जगत असतो. हे सर्व करीत असताना आपले मन आणि शरीर एकत्र ठेवण्याचे काम योगाच्या माध्यमातून साध्य होत असते. योग हा काही व्यायाम नसून तर तो स्वत: मधील क्षमता ओळखण्याची प्रक्रिया आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण आपल्यातील क्षमता जागी करु आणि नियमित योगा करून आरोग्यसंपन्न राहू या असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

जागतिक योग दिन रत्नागिरीत उत्साहात साजरा


यावेळी शिर्के हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी योग गीत सादर केले. राज्यस्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके दाखवली. आंतरराष्ट्रीय योगपटू पूर्वा केंद्रे यांनी यावेळी योगासनांचे प्रात्यक्षित दाखविले. यावेळी पंतजली योग समिती, रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. विद्यानंद जोग यांनी उपस्थित मान्यवरांना योगांचे धडे दिले.


जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मैदान, विवेक हॉटेल हॉल, माळनाका, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. रत्नागिरी आर.के. बामणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी, कंचन चव्हाण पतजंली योग समिती, राज्य कार्यकारणीच्या सदस्या रमाताई जोग, पंतजली योग समिती, रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. विद्यानंद जोग, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, जिल्हा परिषद रत्नागिरीचे आयरे, वैद्य अक्षता सप्रे, आनंद आगाशे आदि योगप्रेमी तसेच गोगटे जोगळेकर विद्यालयातील आणि रा.भा. शिर्के हायस्कूलचे तसेच आदि विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थ्यानी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप जिल्हा क्रिडा अधिकारी मिलींद दीक्षीत यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details