रत्नागिरी- मुसळधार पाऊस त्यात वादळी वारा यामुळे शहरात अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. झाडगाव परिसरात भैरीसहाणे जवळील भारत सावंत यांच्या आवारातील आंब्याचे झाड वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाले. हे झाड संदीप सुर्वे आणि शशी देसाई यांच्या घरावर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर टिळक आळी गणपती मंदीराच्या समोरील आंबा झाड विद्युत वाहिन्यांवर कोसळल्याने परिसरातील वीज गेली होती.
रत्नागिरीत ठिकठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना; मोठं नुकसान
मुसळधार पाऊस त्यात वादळी वारा यामुळे शहरात अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी झाड कोसळून मोठे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी
राजापूर तालुक्यातील कुंभवडे येथील दिलीप सदानंद प्रभुदेसाई यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्याने घराचं नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाड कोसळून नुकसानीच्या घटना घडल्याचे पाहायला मिळाले.