महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'संजय राऊत यांना बेळगावात अटकाव झाल्यास महाराष्ट्रातील जनता जशास तसे उत्तर देईल' - News about Belgaum

संजय राऊत यांना बेळगावात अटकाव करण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्रातील जनता जशास तसे उत्तर देऊल असे खासदार विनायक राऊत म्हणाले. ते रत्नागिरी येथे बोलत होते.

inayak Raut said that if Sanjay Raut is detained in Belgaum, he will reply
खासदार विनायक राऊत

By

Published : Jan 18, 2020, 11:30 AM IST

रत्नागिरी -संजय राऊत यांना बेळगावात अटकाव करण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्रातील जनता जशास तसे उत्तर देईल, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. रत्नागिरी येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. शुक्रवारी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राज्य मंत्री राज्यमंत्री राजेंद्र पाटील बेळगावला गेले होते. तिथे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन महाराष्ट्राच्या सीमेवर आणून सोडले होते. या बद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले होते, 'बेळगावमध्ये जाण्यापासून मला रोखायचे असेल तर कायदेशीर पद्धतीने रोखावे. जबरस्तीने रोखू नये.'

खासदार विनायक राऊत

या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे एका नियोजित कार्यक्रमासाठी बेळगावला निघाले आहेत. त्यांनी या घडल्या प्रकाराच निषेध केला आहे. ते आज दुपारी १२ च्या सुमारास बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. या कार्यक्रमाला कर्नाटक पोलिसांनी काही अटी ठेऊन परवानगी दिली आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते -
संजय राऊत बेळगावमध्ये एका कार्यक्रमासाठी जाणार आहेत. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, सीमा लढ्यात हुतात्मा पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावातील हुतात्मा चौकात गेलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दुपारी कर्नाटक पोलिसांनी अटक केली. त्यांना कानडी सरकारने रोखत धक्काबुक्कीही केली. याचा निषेध त्यांनी व्यक्त केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details