रत्नागिरी- नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आज मोर्चाची हाक देण्यात आली आहे. प्रकल्पाच्या समर्थनार्थ अनेक संघटनासुद्धा यामध्ये उतरल्या आहेत. प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी रत्नागिरी आणि राजापूर शहरातील व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. या बंदला रत्नागिरीत संमिश्र प्रतिसाद मिळत असलेला पहायला मिळत आहे.
रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ रत्नागिरीतल्या व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त बंद
रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आज मोर्चाची हाक देण्यात आली आहे. प्रकल्पाच्या समर्थनार्थ अनेक संघटनासुद्धा यामध्ये उतरल्या आहेत. प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी रत्नागिरी आणि राजापूर शहरातील व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे.
रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील गोखलेनाका, धनजीनाका आणि रामआळी परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी आज उत्फुर्तपणे आपली दुकाने बंद ठेवली होती, तर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी थेट रस्त्यावर उतरत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत होते. रिफानरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चाच्या माध्यमातून आज मोठे शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पावरून कोकणात पुन्हा रान पेटणार आहे.