महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिनांच्या घरावर बाळासाहेबांचं स्मारक झालं असतं, तर हिंदुस्तानवासी खुश झाले असते - निलेश राणे

जिनांच्या घरावर बाळासाहेबांचं स्मारक झालं असतं, तर हिंदुस्तानवासी खुश झाले असते, अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.

nilesh rane
निलेश राणे

By

Published : Mar 31, 2021, 4:40 PM IST

रत्नागिरी : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमीपूजन आज (31 मार्च) मुंबईतील दादर येथे होणार आहे. या सोहळ्यावरून भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

काय म्हणाले निलेश राणे? -

'ज्या बाळासाहेबांनी लाखोंच्या सभा गाजवल्या त्यांच्या स्मारकाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने होणार. स्व. बाळासाहेबांच्या स्मारकाची जागा पण मुंबईकरांकडून चोरली. मुंबईत मोहम्मद अली जिनांचं घर ओसाड पडलं आहे. बाळासाहेबांचं स्मारक तिकडे झालं असतं, तर तमाम हिंदुस्तानवासी खुश झाले असते', असे ट्विट करत निलेश राणेंनी शिवसेनेवर टीका केली आहे.

स्मारकावरून शिवसेनेवर बोचरी टीका -

शिवसेनेची सत्ता येऊन सुध्दाही अनेक वर्षांपासून स्व.बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक रखडलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक विसरलं. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या नावावर फ्लॉट गिळला. ठाकरे कुटूंब स्वतःची मालमत्ता असल्यासारखी त्या फ्लॉटचा वापर करतात. त्यानंतर या स्मारकाला ४०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. आता स्मारक बनवणाऱ्या ठेकेदारांकडून सुद्धा ४०० कोटीतले ३० ते ४० टक्के हे गिळणार, अशीही टीकाही निलेश राणेंनी केली होती.

सकाळीही केली होती शिवसेनेवर टीका -
या सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनाही आमंत्रण देण्यात आले नाही. यावरून भाजप आमदार नितेश राणेंनी सकाळी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. “आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत. मनं खूप लहान झाली आहेत!”, असे ट्विट नितेश राणेंनी केले.

कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळील जुन्या महापौर निवासस्थानी हे स्मारक उभारले जाणार आहे. कोरोना नियमांचे पालन करीत मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा आज सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

हेही वाचा -संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद

हेही वाचा -खासदार इम्तियाज जलीलांसह समर्थकांना पडला कोरोना विसर; लॉकडाऊन रद्द होताच केला जल्लोष

ABOUT THE AUTHOR

...view details