महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकणातल्या शिमगोत्सवाला प्रारंभ; चाकरमान्यांना कोरोनाचे निर्बंध - होळी सण आणि कोकण

शिमगोत्सवाचा अविभाज्य भाग म्हणजे होळी उभी करणे होय. फाक पंचमीला गावागावात होळ्या उभ्या करण्यात येतात. प्रत्येक गावचा शिमगोत्सव साजरा करण्याच्या प्रथा परंपरेत थोडीफार तफावत दिसून येते. या शिमगोत्सवाला फाक पंचमीला प्रारंभ झाला आहे.

कोकणातल्या शिमगोत्सवाला प्रारंभ
कोकणातल्या शिमगोत्सवाला प्रारंभ

By

Published : Mar 19, 2021, 7:19 AM IST

Updated : Mar 19, 2021, 7:26 AM IST

रत्नागिरी- कोकणातील मोठा सण समजल्या जाणाऱ्या शिमगोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ झाला. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फाकपंचमीला फाका सुरू झाल्या असून जिल्हाभरात गावागावात शिमगोत्सवाची लगबग सुरू आहे. मात्र यंदा शिमगोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने अगदी साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जाणार आहे.

शिमगोत्सवाला प्रारंभ
कोरोनाच्या निर्बंधात शिमगोत्सवाला प्रारंभ-जिल्ह्यातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव होय. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, प्रशासनाने शिमगोत्सवासाठी काही अटी व नियम लागू केल्या आहेत. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले चाकरमानी शिमगोत्सवासाठी खास कोकणात दाखल होतात. यावर्षी मात्र हे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे.
कोकणातल्या शिमगोत्सवाला प्रारंभ

शिमगोत्सवाचा अविभाज्य भाग म्हणजे होळी उभी करणे होय. फाक पंचमीला गावागावात होळ्या उभ्या करण्यात येतात. प्रत्येक गावचा शिमगोत्सव साजरा करण्याच्या प्रथा परंपरेत थोडीफार तफावत दिसून येते. या शिमगोत्सवाला फाक पंचमीला प्रारंभ झाला आहे. कोरोनाचे नियम पाळून शिमगोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Last Updated : Mar 19, 2021, 7:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details