रत्नागिरी - शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी युतीबाबत केलेले विधान ( Abdul Sattar Statement About BJP shiv Sena Alliance ) हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ( uday samant on abdul sattar ) दिली आहे. ते आज चिपळूणमध्ये बोलत होते.
उदय सामंत यांनी दिले स्पष्टीकरण -
यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, 'शिवसेनेचा प्रत्येक मंत्री हा शिवसैनिक म्हणून काम करत असतो. शिवसेना पक्षात फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांचाच आदेश चालतो. उद्धव साहेबच पक्षाचं धोरण ठरवत असतात, युती कोणाबरोबर करायची आघाडी कोणाबरोबर करायची. मी जरी त्यांच्या आशीर्वादाने कॅबिनेट मंत्री असलो, तरी पक्षाचे धोरण ठरविण्याचे अधिकार मला नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे जो काही निर्णय घेतील, जो काही आदेश देतील तो आम्हाला शिवसैनिक म्हणून आम्हाला मान्य करावा लागतो' अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.