महाराष्ट्र

maharashtra

Raigad Suspected Boat संशयास्पद बोटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातही हायअलर्ट, पोलिसांकडून विशेष खबरदारी

By

Published : Aug 18, 2022, 7:10 PM IST

Updated : Aug 18, 2022, 7:24 PM IST

संशयास्पद बोटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातही हायअलर्ट High alert in Ratnagiri district जारी करण्यात आला आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग SP Dr Mohit Kumar Garg यांनी सांगितले आहे.

Raigad Suspected Boat
Raigad Suspected Boat

रत्नागिरी -रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेल्या संशयास्पद बोटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातही हायअलर्ट High alert in Ratnagiri district जारी करण्यात आला आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग SP Dr Mohit Kumar Garg यांनी सांगितले आहे. श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी बोट सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन-तीन एके-47 आढळल्या. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्या आढळून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक

कोस्टल चेक पोस्ट तसेच, स्पेशल चेक पोस्ट लावून कसून चौकशी करण्यात येत आहे. रत्नागिरीच्या सर्वच किनारपट्टीच्या त्याबरोबरोबरच जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या चेकपोस्टवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच कोणालाही काही संशयस्पद आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिली आहे.

हेही वाचा -Devendra Fadnavis हरिहरेश्वरमधील संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची, उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Last Updated : Aug 18, 2022, 7:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details