रत्नागिरी - जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. पहाटे जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा शिडकावा झाला होता तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, संध्याकाळी संगमेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरात चांगलाच पाऊस बरसला. संगमेश्वरमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीटही झाली. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला.
रत्नागिरीमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस तर संगमेश्वरमध्ये काही ठिकाणी गारपीट - गारपीट
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा शिडकावा होतोय. या पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता मात्र आणखीन वाढली आहे. दरम्यान, आजही पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी चांगलीच हजेरी लावली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा शिडकावा होतोय. या पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता मात्र आणखीन वाढली आहे. दरम्यान, आजही पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी चांगलीच हजेरी लावली. संगमेश्वर तालुक्यात तर अवकाळीसह गारपिट झाली. संगमेश्वर तालुक्यातला आज दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले. माखजन, बुरंबाड, गोळवली, धामणी, साखरपा परिसरात गारपीट झाली. तर वादळी वाऱ्याने साखरपा परिसरात दोन ठिकाणी झाडे कोसळली. विजपुरवठाही खंडित झाला आहे. तर वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे मोठे नुकसानही झाले आहे. या पावसामुळे आंब्याचे मात्र मोठे नुकसान झाले.