महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; सोमेश्वरच्या सखल भागात शिरले पाणी - जनजीवन विस्कळीत

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा आपला जोर कायम ठेवला आहे. नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील काही गावांमध्ये पूरसदृष्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

By

Published : Jul 30, 2019, 5:48 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. काजळी नदीला पूर आल्याने सोमेश्वर, पोमेंडी, चांदेराई गावात पूरसदृष्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सोमेश्वर मोहल्ला येथे सकाळपासून पाणी भरले आहे. पहाटेपासून याभागात पाणी भरायला सुरवात झाली. पुराचे पाणी भरल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान चिपळूण, राजापूरमध्येही काहीशी अशीच स्थिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details