महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले; २४ तासात १००.५६ मिमी पाऊस - रत्नागिरी पूर

मागील २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात १००.५६ मिमी पाऊस पडला आहे. चिपळूणमध्ये सर्वाधिक १४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी पाऊस

By

Published : Sep 4, 2019, 11:47 AM IST

Updated : Sep 4, 2019, 12:04 PM IST

रत्नागिरी- पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात १००.५६ मिमी पाऊस पडला आहे. चिपळूणमध्ये सर्वाधिक १४० मिमी पावसाची नोंद झाली. सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलं

हेही वाचा - पावसामुळे ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर दरड कोसळली; वाहतूक ठप्प

रत्नागिरीतल्या काजळी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. त्याचा फटका जुवे, हातीस, चांदेराई, पोमेंडी, सोमेश्‍वर या गावांना बसला आहे. राजापूर, चिपळूण, संगमेश्‍वरमध्येही काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.

हेही वाचा - खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्याला तीन ते चार वेळा पुराचा फटका सहन करावा लागला आहे. या पुरामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. याचा सर्वाधिक फटका चिपळूण, राजापूर, रत्नागिरीला बसला होता. पाऊस थांबल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पावसाने मागील आठवड्यापासून बरसायला सुरवात केली आहे.

ऐन गणेशोत्सवात पाऊस पडत असल्याने चाकरमानी आणि गावकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. गणेश चतुर्थीच्या आगमनाच्या आदल्या दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. आज चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान येत्या ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच राहीला तर पुन्हा जिल्ह्याला पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग; शेतकऱ्यांना दिलासा

२४ तासांत १००.५६ मिमी पाऊस

गेल्या २४ तासात जिल्ह्यात ९०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी १००.५६ मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस चिपळूण तालुक्यात पडला असून चिपळूणमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल राजापूरमध्ये ११५ मिमी, खेडमध्ये ११०, दापोलीत १०५ मिलिमीटर, मंडणगडमध्ये ९५ मिमी आणि गुहागरमध्ये ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातही ८० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

Last Updated : Sep 4, 2019, 12:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details