महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 'बायपास रोड'वरून, वाशिष्ठी पुलावर अद्यापही पाणी

जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. चिपळूणमध्ये तर पावसाने हाहाकार माजवला आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी चिपळूण बाजारपेठेत घुसले आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी आहे, तर काही ठिकाणी 4 ते 5 फूट पाणी आहे.

चिपळूण शहरात पुराचं पाणी, बाजारपेठ पाण्याखाली
चिपळूण शहरात पुराचं पाणी, बाजारपेठ पाण्याखाली

By

Published : Aug 16, 2020, 1:08 PM IST

Updated : Aug 16, 2020, 1:54 PM IST

रत्नागिरी -जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. दरम्यान, चिपळूणमध्ये तर पावसाने हाहाकार माजवला आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी चिपळूण बाजारपेठेत घुसले आहे. त्यामुळे महसूल विभाग, नगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, या पुराच्या पाण्यामुळे चिपळूण बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी आहे, तर काही ठिकाणी 4 ते 5 फूट पाणी आहे.

चिपळूण शहरात पुराचं पाणी, बाजारपेठ पाण्याखाली
चिपळूण शहरात पुराचं पाणी, बाजारपेठ पाण्याखाली

शहरातील पूजा टॉकिजपर्यंत पाणी आहे, तसेच बाजारपूल पाण्याखाली गेला आहे. चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकपर्यंत पाणी शिरले आहे. त्यामुळे बसस्थानकातील सर्व एसटीच्या गाड्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. चिपळूण शहरातील वडनाका, चिंचनाका, पेठमाप अशा भागात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहेत. तर, सांस्कृतिक केंद्राच्या परिसरातही पुराचा वेढा पडला आहे. या पुरामुळे चिपळूण शहरातील व्यापाऱ्यांचे, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, वाशिष्ठीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील पूल काल (शनिवार) रात्री वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, नदीची धोक्याची पातळी कायम असल्याने सकाळीही हा पूल वाहतुकीसाठी बंद होता. यामुळे वाहतूक गुहागर बायपास रोडकडून वळविण्यात आली आहे.

Last Updated : Aug 16, 2020, 1:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details