महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी रेल्वे स्थानकात आरोग्य पथके तैनात

कोरोनाचा प्रसार लक्षात घेता प्रशासनाकडून कोकोण रेल्वे मार्गावरील काही प्रमुख स्थानकांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. या रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे.

corona ratnagiri
प्रतिकात्मक

By

Published : Mar 17, 2020, 4:39 PM IST

रत्नागिरी- राज्यात कोरोनाचे सावट अधिक गडद होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानकावर आरोग्य पथके तैनात केली आहेत. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे समजत आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

कोरोनाचा प्रसार लक्षात घेता प्रशासनाकडून कोकोण रेल्वे मार्गावरील काही प्रमुख स्थानकांवर आरोग्य पथके तैनात केली आहेत. रत्नागिरी रेल्वे स्थानकात प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. या रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. संशयित वाटणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात असून रेल्वे प्रशासनाने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता स्वच्छता मोहीम देखील हाती घेतली आहे. रत्नागिरीसह चिपळूण, खेड रेल्वे स्थानकांबरोबरच जिल्ह्याच्या सर्व सिमांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. कोरोनाच्या धास्तीने प्रवासीदेखील जागरुक झाल्याचे चित्र पहायला मिळत असून प्रवासादरम्यान मास्कचा वापर केला जात आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मनाई आदेश लागू

ABOUT THE AUTHOR

...view details