रत्नागिरी - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तिवरे दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांची कामथे उपजिल्हा रुग्णालयात भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत जाहीर करुन दुर्घटनाग्रस्तांना ४ महिन्यात पक्की घरे बांधून देणार असल्याचे सांगितले.
तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांची गिरीश महाजनांनी घेतली भेट, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर - tiware dam mishap
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तिवरे धरण दुर्घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.
गिरीश महाजन
महाजनांनी दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले. तिवरे धरण दुर्घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल असे ते म्हणाले. यावेळी महाजन यांच्या सोबत रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वाईकर, आमदार सदानंद चव्हाण यांनी देखील मृतकांच्या नातेवाईकांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.