महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दापोलीतल्या पाळंदे समुद्रकिनारी आढळला महाकाय मृत डॉल्फिन मासा - पाळंदे समुद्रकिनारी मृत डॉल्फिन मासा

दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी मृत डॉल्फिन मासा सापडला होता. वनविभागाने या महाकाय मृत माशाची रविवारी विल्हेवाट लावली. दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनाऱ्याला एक महाकाय डॉल्फिन मासा लागला होता.

Giant dead dolphin fish
दापोलीतल्या पाळंदे समुद्रकिनारी आढळला महाकाय मृत डॉल्फिन मासा

By

Published : Apr 26, 2020, 4:26 PM IST

रत्नागिरी - दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी मृत डॉल्फिन मासा सापडला होता. वनविभागाने या महाकाय मृत माशाची रविवारी विल्हेवाट लावली. दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनाऱ्याला एक महाकाय डॉल्फिन मासा लागला होता. मात्र, हा डॉल्फिन मृत होता. वनविभागाला याची मिळताच रविवारी वनविभागाचे कर्मचारी पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले.

दापोलीतल्या पाळंदे समुद्रकिनारी आढळला महाकाय मृत डॉल्फिन मासा

वन विभागाच्या कर्मचाऱ्याने समुद्रकिनारीच मोठा खड्डा काढून, या मृत माशाची विल्हेवाट लावण्यात आली. डॉल्फिनचे वजन जवळपास 250 ते 300 किलो असून, लांबी 2.70 मीटर आणि गोलाई 1.80 मीटर होती, अशी माहिती दापोलीचे परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details