रत्नागिरी- गणेश भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गणपतीपुळे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिरात येऊ नये, गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, भाविकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी केले.
कोरोना व्हायरस: गणपतीपुळे मंदिर आजपासून बंद... - ratnagiri news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरे बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, काही भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यांना मुख्य प्रवेश द्वारावरुनच परत पाठवले जात आहे. मंदिराच्या आवारात सध्या प्रवेश निषेध करण्यात आला आहे.
हेही वाचा-सर्दी-खोकला झालेल्या नागरिकांत कोरोनाची भीती; डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरे बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, काही भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यांना मुख्य प्रवेश द्वारावरुनच परत पाठवले जात आहे. मंदिराच्या आवारात सध्या प्रवेश निषेध करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच भाविकांसाठी हे मंदिर बंद झाले आहे. पुढील आदेश येईपर्यत हे मंदिर बंद असणार आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिरात येऊ नये, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.