महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत वरूण राजाच्या वर्षावात गौरी-गणपतींना निरोप - मुसळधार

सोमवारी घरोघरी बाप्पाचे आगमन झाले. बाप्पाच्या आगमनालाही वरूण राजाने जोरदार हजेरी लावली होती. तेव्हापासून सुरू झालेला पाऊस आजपर्यंत अगदी मुसळधार बरसत आहे.

गौरी-गणपतींना निरोप

By

Published : Sep 7, 2019, 11:27 PM IST

रत्नागिरी- पावसाच्या मुसळधार वर्षावातच आज जिल्ह्यातील गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार 543 घरगुती आणि 14 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

रत्नागिरीमध्ये गौरी-गणपतींना निरोप

सोमवारी घरोघरी बाप्पाचे आगमन झाले. बाप्पाच्या आगमनालाही वरूण राजाने जोरदार हजेरी लावली होती. तेव्हापासून सुरू झालेला पाऊस आजपर्यंत अगदी मुसळधार बरसत आहे. संपूर्ण गणेशोत्सव हा भर पावसातच साजरा झाला. दरम्यान, शुक्रवारी गौरीची पूजा झाली. आणि आज शनिवारी वरूण राजाच्या वर्षावात गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

रत्नागिरीमध्ये मांडवी किनाऱ्यासह भाट्ये, पांढरा समुद्र, मिऱ्याबंदर, काळबा देवी, साखरतर, आरेवारे किनाऱ्यावर गणपती विसर्जन करण्यात आले. तर गावोगावी नदी तसेच तलावांमध्ये गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यात आले. भर पावसामध्येही पारंपरिक ढोल, ताशांच्या गजरामध्ये गणपती विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details