रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे घाटात बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्यासाठी आलेल्या टोळीला चिपळूण पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत दोघांकडून 3 लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहे.
रत्नागिरीमध्ये बिबट्याच्या कातडीची तस्करी; चौघांना अटक - कातडीची तस्करी
कमलेश देसाई, शशिकांत देसाई, सुनील सावरटकर आणि संजय गुजर, या 4 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रत्नागिरीमध्ये बिबट्याच्या कातडीची तस्करी; चौघांना अटक
कमलेश देसाई, शशिकांत देसाई, सुनील सावरटकर आणि संजय गुजर, या 4 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईत 3 लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे व 50 हजार रुपयांची गाडी, असा एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.