महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुत्र्याचा पाठलाग करताना शौचालयात शिरला बिबट्या,  वनकर्मचाऱ्यांनी केलं जेरबंद

भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या शौचालयात शिरल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील जगलवाडी येथे घडली. वन विभागाने पिंजऱ्याच्या साहाय्याने बिबट्या पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या शिरला शौचालयात, बिबट्याला जेरबंद

By

Published : Jul 31, 2019, 1:10 PM IST

Updated : Jul 31, 2019, 2:58 PM IST

रत्नागिरी -भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या चक्क शौचालयात शिरल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथे घडली आहे. आज सकाळी बिबट्याने अशोक तुकाराम कांबळे यांच्या घराजवळील कुत्र्यावर झडप घातली. मात्र, त्यातून हा कुत्रा निसटला आणि पळत थेट कांबळे यांच्या शौचालयात घुसला.

कुत्र्याचा पाठलाग करताना शौचालयात शिरला बिबट्या, वनकर्मचाऱ्यांनी केलं जेरबंद

कुत्र्या पाठोपाठ बिबट्या देखील शौचालयात घुसला. मात्र त्याचवेळी शौचालयाचा दरवाजा बंद झाल्याने कुत्रा व बिबट्या आतमध्ये अडकले होते. कांबळे जेव्हा शौचालासाठी जाण्यासाठी आले तेव्हा त्यांनी दरवाजा उघडला असता, आतमध्ये त्यांना बिबट्या आणि कुत्रा दिसले. त्यांनी तातडीने दरवाजा पुन्हा बंद करून वन विभागाशी संपर्क केला. घटनेची माहिती समजताच वन विभाग तातडीने पिंजरा घेऊन घटनास्थळी पोहोचले.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शौचालयाच्या वरील भाग फळ्या ठोकून बंद केला आणि शौचालयाच्या तोंडावर पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद केले. हा बिबट्या चार वर्षांची मादी असून, त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Last Updated : Jul 31, 2019, 2:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details