महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी, नगर परिषदेने भोंगा वाजवून दिला सतर्कतेचा इशारा - Arjuna River

राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्यामुळे पुराचे पाणी राजापूर बाजारपेठेत शिरले आहे.

राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले

By

Published : Jul 11, 2019, 8:55 PM IST

रत्नागिरी -मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्यामुळे पुराचे पाणी राजापूर बाजारपेठेत शिरले आहे. त्यामुळे नगर प्रशासनाने 1 वाजता भोंगा वाजवून सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले

मागील २ दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे राजापूर शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. अजुर्ना आणि कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे या नद्या दुथडी भरुन वाहू लागल्यामुळे राजापूर नगर परिषद प्रशासनाने जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास नद्यांचे पाणी राजापूर शहरातल्या बाजारपेठेत घुसू लागले. सध्या राजापूर बाजारपेठेतल्या जवाहर चौकात पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेकांनी आपली दुकानं बंद केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details