रत्नागिरी -जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 5 रुग्ण वाढले आहेत, शुक्रवारी रात्री उशिरा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालातून हे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 82 वर पोहोचली आहे.
चिंताजनक... रत्नागिरी जिल्ह्यात 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 82 वर - 15 corona patient cured
शुक्रवारी रात्री उशिरा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासनाकडे 5 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 82 वर पोहोचली असून 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी रात्री आणखी 5 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. 5 पैकी 4 अहवाल कळंबणी उपकेंद्रांतर्गत खेडमधील 2 व दापोलीतील 2 असून 1 राजापूरमधील आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला तर एकूण 15 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. 64 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांची देखील चिंता वाढली आहे.