रत्नागिरी- मागील १२ दिवसांपासून जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. अरबी समुद्रात वादळासह वेगवान वारे सुरू झाले आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे समुद्रात मासेमारी करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. मासेमारी ठप्प झाल्यामुळे तब्बल तीनशे कोटींचा फटका या व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे मच्छिमार अडचणीत सापडला आहे.
समुद्रातील वादळाने मासेमारी ठप्प, मच्छिमारांना कोट्यवधींचा फटका
अरबी समुद्रात वादळासह वेगवान वारे सुरू झाले आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे समुद्रात मासेमारी करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. मासेमारी ठप्प झाल्यामुळे तब्बल तीनशे कोटींचा फटका या व्यवसायाला बसला आहे.
मिनी पर्सेसिन आणि पर्सेसिन नौकांना १ सप्टेंबरपासून मासेमारी करण्यास परवानगी आहे. मात्र, मागील १२ दिवस किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढल्याने अनेक मच्छिमारांनी नौका उभ्या करून ठेवणे पसंत केले. मागील १२ दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. किनारपट्टी भागात गारठवणारे वेगवान वारे वाहत आहेत. याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे हंगामापासूनच अनिश्चित हवामानाच्या तडाख्यात सापडलेल्या मासेमारी व्यवसायाला पुन्हा एकदा हवामानतील बदलाचा फटका बसला आहे.
दरम्यान १ सप्टेंबरपासून बोटींवर कामासाठी लागणारे खलाशीही दाखल झाले होते. मात्र, मासेमारीच ठप्प झाल्याने त्यांना भत्ता देण्यासाठीही पैसे नसल्याचे नौका मालक सांगत आहेत. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा मच्छिमार व्यक्त करत आहेत.