रत्नागिरी -साखरतरमधील दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. 7 एप्रिलला साखरतर भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता, त्यानंतर या रुग्णाच्या घरातील आणखी एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, आता या दोन्ही रुग्णांचा उपचारानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. ही बाब रत्नागिरीकरांसाठी दिलासा देणारी आहे. आता दुसऱ्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
रत्नागिरीतल्या त्या' दोन कोरोनाबाधितांचा उपचारानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह - कळंबणी
रत्नागिरीतील 68 अहवालापैकी 52 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारानंतरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ही बाब रत्नागिरीकरांसाठी दिलासा देणारी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील 52 तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये साखरतर येथे पॉझिटिव्ह असलेल्या दोन रुग्णांचे उपचारानंतरचे पहिले अहवाल आता निगेटिव्ह आले आहेत. पहिला अहवाल निगेटिव्ह आल्याने दुसऱ्या अहवालाची प्रतीक्षा आहे. तसेच कामथे उपजिल्हा रुग्णालयातील दहा रुग्णांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील चाळीस रुग्णांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
रत्नागिरीतील प्रलंबित 68 अहवालापैकी 52 अहवाल आतापर्यंत प्राप्त झाले असून हे सर्व निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामध्ये 6 महिन्याच्या बाळाचे रिपोर्ट बाकी आहेत. त्याच्यावरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.