रत्नागिरी- जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरूवारी संध्याकाळी या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. मुळचा गुहागर तालुक्यातील शृंगारतळी गावचा हा ५० वर्षीय व्यक्ती होता. तो दुबईहून आला होता. 19 मार्चपासून या रुग्णावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आता त्याचे दोन्ही कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.
रत्नागिरीतील पहिल्या कोरोनाबाधिताला डिस्चार्ज, जिल्ह्यात 5 कोरोना रुग्ण
जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरूवारी संध्याकाळी या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. मुळचा गुहागर तालुक्यातील शृंगारतळी गावचा हा ५० वर्षीय व्यक्ती होता. तो दुबईहून आला होता.
रत्नागिरीतील पहिल्या कोरोनाबाधिताला डिस्चार्ज
जिल्ह्यात होम क्वारंटाईनची संख्या 1 हजार 28 आहे. संस्थात्मक क्वारंटाईनअंतर्गत असणार्यांची संख्या 220 आहे. परप्रांतातून आलेल्या आणि जिल्ह्यात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्ह्यात 54 निवारागृहे सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान आज जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा रुग्ण सापडल्याने जिल्ह्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.