महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन ३.० : दापोलीत क्वारंटाईन कक्षाबाहेर झोपणाऱ्यावर गुन्हा दाखल - Ratnagiri latest news

क्वारंटाईन वॉर्डात न झोपता बाहेर झोपणाऱ्या एकावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरातवरून आलेले हे कुटुंबीय क्वारंटाईन वॉर्डाबाहेर झोपले होते.

quarantine ward
क्वारंटाईन कक्ष

By

Published : May 9, 2020, 1:25 PM IST

रत्नागिरी- क्वारंटाईन वॉर्डात न झोपता बाहेर झोपणं एका कुटुंबाला चांगलंच महागात पडले आहे. याप्रकरणी दापोलीच्या क्वारंटाईन वॉर्डतील एकावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्वारंटाईन वॉर्डात फिजिकल डिस्टनसिंग न राखता व सूचना न पाळता कक्षाच्या बाहेर हा व्यक्ती येऊन झोपला होता. प्रशासनाने हा फोटो काढून तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अतिथी गृह क्र.1 शेतकरी भवन इमारतीतीत विलगीकरण केंद्रात गुजरातवरून हर्णे येथे आलेल्या एका कुटुंबाला दाखल करण्यात आले होते. त्यांना खोलीत ठेवण्यात आले होते. त्यांना बेड, गादी, सतरंजी इत्यादी देण्यात आले होते. तरीही सदर व्यक्तीने त्यांच्यासोबत आलेल्या कर्मचाऱ्याला ही व्यवस्था मान्य नसल्याचे सांगून खोलीमध्ये झोपण्यास नकार दिला. निवासाची व्यवस्था उपलब्ध करुन दिली असतनाही मुद्दाम निवास कक्षाच्या बाहेर कॉरीडॉरमध्ये झोपण्याचा खोटा दिखावा करून फोटो काढून घेतले.

याबरोबरच सकाळी नाष्टा नाकारून उपीट आम्हाला नको, अशा स्वरूपाची उध्दट उत्तरे दिली होती, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details